Gross Domestic Product ? : सकल देशांतर्गत उत्पादन

Gross Domestic Product देशाच्या अर्थव्यवस्थेतील मूलभूत समजला जाणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच GDP अर्थातच Gross Domestic Product ज्याला मराठीत स्थूल/सकल देशांतर्गत उत्पादन म्हटले जाते. GDP आपल्याला कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती व प्रगती यांचे आकलन करून देण्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

Gross Domestic Product समाविष्ट घटक Gross Domestic Product

1 . व्याख्या2 . GDP चा इतिहास
3 . GDP संकल्पनेचे महत्त्व4 . GDP चे प्रकार
5 . GDP चा दर ठरविण्याची पद्धती6 . GDP मोजण्याच्या पद्धती
7 . भारताचा GDP वृद्धिदर वर्षनिहाय8 . आकारमानानुसार अर्थव्यवस्थांची क्रमवारी
9 . भारताची आर्थिक लवचिकता आणि विकासाचे वाहक10 . राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या संकल्पना

1) व्याख्या

एका विशिष्ट कालावधीमध्ये देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा यांच्या मूल्यांच्या एकूण उत्पन्नाला GDP अर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन म्हटले जाते. सध्या भाषेत सांगायचे झाल्यास Gross Domestic Product हे देशाच्या एकूण आर्थिक क्रियाकलापांचे एक व्यापक मोजमाप आहे.

Gross Domestic Product ची आकडेवारी ही देशभरामध्ये दर 3 महिन्याला प्रदर्शित होते. GDPचा दर ठरविण्यासाठी देशांतर्गत झालेल्या उत्पादनांचा आणि सेवेचा विचार केला जातो.

एखाद्या देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवतो करीत असतो.प्रत्येक देशामध्ये देशाचा GDPचा अंक पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरवले जाते.

शिवाय कोणकोणत्या क्षेत्रातून देशाला आर्थिक लाभ झाला आहे GDP द्वारे ठरविले जाते.

2) GDPचा इतिहास

औद्योगिक क्रांतीचा परिणाम मोजण्यासाठी साधारणपणे GDP या शब्दाचा वापर करण्यात आला.

आधुनिक काळात GDP हा शब्द पहिल्यांदा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन कुझनेट्स यांनी 1935 मध्ये वापरला होता. सायमनने अमेरिकेला ही संज्ञा दिली होती.

सर्व जगातील बँकिंग संस्था आर्थिक विकासा ( Economic Development )चा अंदाज बांधण्याचे काम हाताळत होत्या, त्यापैकी बहुतेकांना त्यासाठी शब्द सापडत नव्हता.

जेव्हा सायमनने यूएस काँग्रेसमध्ये GDP या शब्दाची व्याख्या या शब्दासह केली तेव्हा IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा शब्द वापरण्यास सुरुवात केली.

ब्रेटनवुड परिषदेमध्ये देशाला संबोधण्यासाठी GDP या संकल्पनेचा वापर करण्यात आला.

3) GDP संकल्पनेचे महत्त्व

GDP एखाद्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती दाखवित असते. त्यामुळे दोन किंवा अनेक अर्थव्यवस्थांची तुलना करण्यासाठी GDP चा वापर करता येतो.

Gross domestic product मधील वार्षिक फरकाच्या टक्केवारीला आर्थिक वृद्धीदर असे म्हणतात GDP मुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. गुणात्मक नव्हे.

GDP च्या आकडेवारीनुसार आपला देश आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे की नाही हे कळते. तसेच देशाचा विकास ( Development) होत आहे की नाही याबद्दल माहिती मिळते.

परिणामी देशाचा सरकार या Gross domestic product च्या आकडेवारीनुसार आधारित विविध ध्येय धोरणे/ योजना देखील ठरवत असते. त्याचा येत्या कालावधीत चांगला परिणाम पाहावयास मिळू शकतो.

याव्यतिरिक्त देशावर आर्थिक संकट ओढावणार असेल तर त्याची पूर्वकल्पना GDP च्या आकडेवारीतून मिळते. देशात येऊ शकणाऱ्या मंदीची आधीच चाहूल लागणे शक्य होते.

4) GDPचे प्रकार Gross Domestic Product

i) वास्तविक GDP (Real GDP)

ii) नाममात्र GDP (Nominal GDP)

नाममात्र GDP चलनवाढीसाठी समायोजित न केलेले वर्तमान डॉलरमधील कच्चे आकडे प्रतिबिंबित करते. वास्तविक GDP चलन मूल्य निश्चित करून संख्या समायोजित करते,

अशा प्रकारे चलनवाढ किंवा चलनवाढीमुळे होणारी कोणतीही विकृती दूर करते.

नाममात्र GDP वर्तमान किंमतीवर वस्तू किंवा सेवांचे वार्षिक उत्पादन मोजते. दुसरीकडे, रिअल GDP महागाईच्या प्रभावाचा विचार न करता वास्तविक किंमतीवर गणना केलेल्या वस्तू किंवा सेवांचे वार्षिक उत्पादन मोजते.

5) GDP चा दर ठरविण्याची कालावधी

GDPचा दर हा मुख्यतः दोन पद्धतीने निश्चित केला जातो. कारण चलन वाढीसह उत्पादनात घट होते. हे प्रमाण कॉन्स्टंट प्राईस म्हणजे कायमस्वरूपी दर आहे आणि यानुसार GDPचा दर आणि उत्पादनाचे मूल्य एका वर्षाच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चावरून ठरविले जाते.

i) वार्षिक GDP (Annual GDP)

ii) तिमाही GDP (Quarterly GDP)

i) वार्षिक GDP (Annual GDP) :

वार्षिक GDP मध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची मागील वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाशी तुलना केली जाते.

ii) तिमाही GDP (Quarterly GDP) :

तिमाही GDP मध्ये मागील वर्षाच्या कोणत्याही तीन महिन्यातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना चालू वर्षातील तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

1991 पासून तिमाही पद्धतीने GDP मोजायला सुरूवात झाली. त्याआधी GDP वार्षिक पद्धतीनेच मोजल्या जात होता.

उदाहरणार्थ- 2021 च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना 2022 च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

ही तुलना करून आलेल्या निष्कर्षावरून देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) चा दर Gross Domestic Product Rate ठरविला जातो. म्हणजेच गेल्या वर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढले असेल तर GDP चा दर वाढला असे समजले जाते.

या उलट गेल्यावर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये घट झाली असेल तर GDP चा दर घसरला असे म्हणतात.

6) GDP मोजण्याच्या पद्धती

i) खर्च पद्धत

ii) उत्पन्न पद्धत

iii) उत्पादन पद्धत/मूल्यवर्धित पद्धत

i) खर्च पद्धत :

यामध्ये देशातील सरकार, व्यवसाय आणि घरगुती घटकांनी केलेल्या खर्चानुसार GDP मोजला जातो.

GDP = C + I + G + (X-M)

C– अर्थव्यवस्थेतील ग्राहकांचा खर्च.

I – भांडवली उपकरणे, गृहनिर्माण, इत्यादी क्षेत्रात झालेली देशाची गुंतवणूक.

G– देशाचा सर्व सरकारी खर्च.

X – देशाची निव्वळ निर्यात (Export).

M- देशाची निव्वळ आयात (Import). F

GDP ची मोजणी करण्यासाठी खर्च पद्धती ही सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पद्धत आहे.

खर्च पद्धत ही उर्वरित जगाचा प्रभाव दर्शवत असल्यामुळे सर्वसामान्यपणे या पद्धतीचा वापर करण्यात येतो व ही अचुक पद्धत मानण्यात येते.

ii) उत्पन्न पद्धत :

उत्पन्न पद्धतीमध्ये देशातील सर्व घटकांना मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज करून GDP मोजला जातो.

GDP = W + R + I + P

W= मजुरी
R = भाडे
I= व्याज
P = नफा

यामध्ये घटकांनी कमावलेल्या उत्पन्नाचा विचार केला जातो. जर घटकांना न कमावता उत्पन्न मिळाले असेल तर ते समाविष्ट केल्या जात नाही. उदा. मदत किंवा बेरोजगारी भत्ता

iii) उत्पादन पद्धत / मूल्यवर्धित पद्धत :

या पद्धतीमध्ये वस्तू जेवढ्या टप्प्यातून तयार झाली त्या प्रत्येक टप्प्यावरचे मूल्यवर्धन करण्यात येते.
उत्पादन पद्धतीला खर्च पद्धतीच्या उलट पद्धती म्हणून देखील ओळखले जाते.

GDP = प्रत्येक टप्प्यावर होणारी एकूण मूल्य वाढ किंवा

GDP = विक्रीचे एकूण मूल्य मध्यवर्ती वस्तूंची किंमत.

7) भारताचा GDP वृद्धिदर वर्षनिहाय

2001-02 : 4.8
2002-03 : 3.8
2003-04 : 7.9
2004-05 : 7.9
2005-06 : 7.9
2006-07 : 8.1
2007-08 : 7.7
2008-09 : 3.1
2009-10 : 7.9
2010-11 : 8.5
2011-12 : 5.2
2012-13 : 5.5
2013-14 : 6.4
2014-15 : 7.4
2015-16 : 8
2016-17 : 8.2
2017-18 : 7.2
2018-19 : 6.8
2019-20 : 4.2
2020-21 : (-) 7.3
2021-22 : 8.7
2022-23 : 7.2

2023-24 : 6.7 (अपेक्षित)

2016-17 पासून भारताच्या वृद्धीदरात घसरणीचा कल दिसून येतो. कोरोना महामारीच्या काळात देशाने नीचांकी (-7.3) वृद्धिदर नोंदविला. परंतु कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून भारत सातत्याने वृद्धी करत असल्याचे पाहावयास मिळते.

वर्तमानात भारतीय अर्थव्यवस्था तिच्या आकारमानानुसार जगात 5व्या क्रमांकावर आहे.

नुकतेच भारताने ब्रिटनला मागे टाकून जागतिक अर्थव्यवस्थेत 5वा क्रमांक मिळविला आहे.

8) आकारमानानुसार अर्थव्यवस्थांची क्रमवारी

1- अमेरिका
2- चीन
3- जपान
4- जर्मनी
5- भारत
6- ब्रिटन
7- फ्रांस
8- इटली
9- कॅनडा
10- दक्षिण कोरिया

2020 मध्ये जगाने अनुभवलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे भारताला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

याच काळात भारताने संरचनात्मक मंदी अनुभवली. संरचनात्मक मंदी म्हणजेच “जेव्हा सलग दोन तिमाहीत देशाचा GDP वृद्धिदर ऋणात्मक असतो”. 2020- 21च्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये भारतात ही परिस्थिती होती.

9) भारताची आर्थिक लवचिकता आणि विकासाचे वाहक

आर्थिक सर्वेक्षण 2023 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की भारतीय रिझर्व बँकेने लागू केलेले आर्थिक निर्बंध, CAD चा विस्तार आणि निर्यातीमधील विकास खुंटणे, हे युरोपमधील भू- राजकीय संघर्षाचे परिणाम आहेत.

या घडामोडींमुळे Financial Year 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीला जोखीम निर्माण झाली होती. त्यामुळे जगतातील अनेक संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा Growth Rate कमी राहील, असे आपल्या सुधारित अंदाजात वर्तवले आहे.

NSO ने जाहीर केलेल्या आगाऊ अंदाजांसह सर्व अंदाज भारताचा Growth Rate 6.5 ते 7.0 % या श्रेणीमध्ये राहील, असे सुचवत आहेत.

उर्ध्व दिशेने सुधारणा होत असून देखील, आर्थिक वर्ष 2023 साठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज जवळ जवळ सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा अधिक आहे आणि कोरोना महामारीच्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या सरासरी वाढीपेक्षा किंचित अधिक आहे.

भारत 2022 मध्ये वेगाने वाढणाऱ्या 2 प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असेल असा अंदाज International Monetary Fund (IMF) ने व्यक्त केला होता.

मोठ्या प्रमाणात जागतिक विपरीत परिस्थिती आणि देशांतर्गत कठोर Monetary Policy असूनही, जर आधारभूत परिणामाचा फायदा न घेता भारताचा आर्थिक Growth Rate अजूनही 6.5 ते 7.0 % च्या दरम्यान अपेक्षित असेल तर ते भारताच्या सूक्ष्म, मूलभूत आर्थिक लवचिकतेचे प्रतिबिंब आहे.

अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या संवाहकांना पुन्हा रुळावर आणण्याची, त्यांचे Renewal करण्याची आणि त्यांना पुन्हा Active करण्याची क्षमता यात आहे.

10) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या संकल्पनाGross Domestic Product

i) GDP (सकल देशांतर्गत उत्पादन)

ii) GNP (सकल राष्ट्रीय उत्पादन)

iii) NNP (निव्वळ राष्ट्रीय उत्पादन)

vi) NDP (निव्वळ देशांतर्गत उत्पादन)

i) GDP (सकल देशांतर्गत उत्पादन) :

एका आर्थिक वर्षात एखाद्या अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न अर्थात GDP होय.

GDP मध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत स्वदेशी तसेच विदेशी नागरिकां द्वारे उत्पादित वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो.

ii) GNP (सकल राष्ट्रीय उत्पादन) :

अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात प्रदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज करून देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते तेव्हा त्या अंतिम मूल्यास स्थूल राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात.

GNP देशाची बहिर्गत शक्ती दाखवत असते, तसेच यामुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन होण्यास मदत होते.

जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थव्यवस्थेची तुलना करताना जीएनपीच्या दरडोई उत्पन्नाचा आधार घेतात.

iii) NNP (निव्वळ राष्ट्रीय उत्पादन) :

सकल राष्ट्रीय उत्पन्नामधून ( GNP) घसारा वजा केल्यास मिळणाऱ्या एकूण मूल्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात.

vi) NDP (निव्वळ देशांतर्गत उत्पादन) :

एकूण सकल देशांतर्गत उत्पादनामधून घसारा वजा केल्यास मिळणाऱ्या एकूण मूल्यास निव्वळ देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात.

MPSC Radio Channel

The Uniform Civil Code : समान नागरी कायदा काय आहे ? | Need For Uniform Civil Code

Leave a Comment