Greedflation: What is greedflation |ग्रीडफ्लेशन म्हणजे काय ?

What is greedflation : युरोप आणि अमेरिकेमध्ये दिसून येत असलेल्या अलीकडच्या परिस्थितीतून हे सिद्ध झाले आहे की ग्रीडफ्लेशनमुळे महागाईबरोबरच जगण्याच्या खर्चातदेखील वाढ होत आहे.What is greedflation

समाविष्ट घटक

A) महागाईशी संबंधित संकल्पना

B) महागाईची कारणे

C) महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात केली जाणारी वाढ

D) मजुरीव्यतिरिक्त महागाईसाठी कारणीभूत घटक

E) ग्रीडफ्लेशन(Greedflation)

A – महागाईशी संबंधित संकल्पना

1) चलनवाढ (Inflation)

2) मुद्रा अवस्फिती (Deflation)

3) मुद्रा अपस्फिती (Disinflation)

4) मुद्रा संस्फिती (Reflation)

5) मुद्रा अवपात (Stagflation)

1- चलनवाढ (Inflation) :

अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या सामान्य किमतीची पातळी वाढणाऱ्या दराला चलनवाढ / महागाई असे म्हणतात.

विशिष्ट कालावधीत किमतीच्या टक्केवारीत होणाऱ्या वाढीनुसार चलनवाढीचा दर मोजला जातो.

उदाहरणार्थ- जून 2023 मध्ये चलनवाढीचा दर 5% असेल तर याचाच अर्थ मागील वर्षाच्या जूनच्या तुलनेत किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

2-मुद्रा अवस्फिती (Deflation) :

लोकांकडील पैशाच्या प्रमाणात घट झाल्यास लोक पैशाची बचत करू लागतात. यामुळे वस्तू व सेवांच्या मागणीत घट होऊन त्यांच्या किमती कमी होऊ लागतात या परिस्थितीला मुद्रा अवस्फिती असे म्हणतात.

3-मुद्रा अपस्फिती (Disinflation) :

या परिस्थितीत अर्थव्यवस्थेत चलनवाढ होत असते मात्र चलनवाढीचा दर कमी होत असतो.

उदाहरणार्थ- 2020 मध्ये एका वस्तूची किंमत 20% ने वाढली तीच किंमत 2021 मध्ये 15% ने तर 2022 मध्ये 10% ने वाढली.

चलनवाढीच्या या सातत्याने कमी होणाऱ्या दराला मुद्रा अपस्फिती असे म्हणतात.

4-मुद्रा संस्फिती (Reflation) :

अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची कमतरता निर्माण झाल्यास मंदीची परिस्थिती निर्माण होते. अर्थव्यवस्थेला या मंदीच्या परिस्थितीतून
बाहेर काढण्यासाठी शासन विविध वित्तीय तरतुदींच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह वाढविते.

अर्थव्यवस्थेला मंदीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या या प्रक्रियेला मुद्रा संस्फिती असे म्हणतात.

5-मुद्रा अवपात (Stagflation) :

काही अर्थशास्त्रीय कारणामुळे अर्थव्यवस्थेत चलनवाढ होत असताना देखील अर्थव्यवस्थेची वृद्धी होत नाही या परिस्थितीला मुद्रा अवगत असे म्हणतात.

B – महागाईची कारणे

i) खर्च दाबजन्य चलनवाद

ii) मागणी जन्य चलनवाढ

i) सर्व दावजन्य चलनवाढ :

वाढत्या उत्पादन खर्चामुळे वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा खर्च दावजन्य चलनवाद उद्भवते.

उदाहरणार्थ कच्चा माल, मजूर किंवा ऊर्जेची किंमत वाढल्यास उत्पादकांकडून तूंच्या किमती वाढविल्या जातात.

ii) मागणी जन्य चलनवाढ :

अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तूंपेक्षा त्या वस्तूंची मागणी अधिक झाल्यास मागणी जन्य चलनवाढीची परिस्थिती उद्भवते.

जर वस्तू आणि सेवांची मागणी उपलब्ध पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर उत्पादक नफा वाढविण्यासाठी वस्तूंच्या किमती वाढवितात.

चलनवाढीवरील उपाय

i) अतिरिक्त मागणीचे व्यवस्थापन

ii) मजुरी किंमत चक्र (Wage-Price Spiral) रोखणे

i) अतिरिक्त मागणीचे व्यवस्थापन :

मागणीजन्य चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाते.

व्याजदरामुळे कर्ज घेणे अधिक महाग होते; परिणामी एकूण खर्च आणि अर्थव्यवस्थेतील मागणी कमी होण्यासाठी मदत होते.

खर्च दाबजन्य चलनवाढीच्या परिस्थितीत देखील मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाते.

मध्यवर्ती बँकेकडून केले जाणारे हे उपाय थेट पुरवठ्याच्या समस्यांचे निराकरण करत नसले तरीही एकूण मागणीवर मर्यादित कालावधीसाठी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भविष्यातील किंमत वाढीस प्रतिबंध करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

ii) मजुरी किंमत चक्र (Wage Price Spiral) रोखणे :

चलनवाढीच्या परिस्थितीत मजुरी किंमत चक्र टाळणे हे मध्यवर्ती बँकांचे उद्दिष्ट असते.

जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा कामगार त्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी जास्त वेतनाची मागणी करतात. परिणामी व्यवसायांसाठीच्या उत्पादन खर्चात वाढ होते.

ग्राहकांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे हे चक्र चालू राहते त्यामुळे वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होते.

मौद्रिक धोरणांच्या साहाय्याने चलनवाढीचे व्यवस्थापन करून मध्यवर्ती बँक या चक्रावर नियंत्रण ठेवण्याचे आणि अर्थव्यवस्थेत किंमत स्थिरता राखण्याचे उद्दिष्टे ठेवते.

” मजुरी किंमत चक्र (Wages Price Spiral) “

कामगारांच्या वेतनाच्या मागण्या आणि वस्तू व सेवांची वाढती मागणी

जेव्हा वस्तूंच्या किंमती वाढतात तेव्हा कामगार त्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी स्वाभाविकपणे जास्त वेतनाची मागणी करतात.

मात्र उत्पादकता वाढविल्याशिवाय वेतनात केलेली वाढ एकूण मागणीला प्रोत्साहन देते.

यामुळे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.

C – महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात केली जाणारी वाढ

मजुरी किंमत वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच महागाई व्यवस्थापन करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून अनेकदा व्याजदरात वाढ केली जाते..

कर्ज घेणे अधिक महाग करून अर्थव्यवस्थेतील मागणी कमी करणे हा यामागचा उद्देश असतो.

मात्र या उपायामुळे आर्थिक क्रियाकलापांना खीळ बसून अर्थव्यवस्थेतील रोजगारात घट होण्याची शक्यता असते.

B – मजुरीव्यतिरिक्त महागाईसाठी कारणीभूत घटक

i) कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामुळे वाढलेल्या किंमती

ii) उत्पादन खर्चातील वाढ

iii) अतिरिक्त नफा आणि बाजारभाव

i) कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामुळे वाढलेल्या किंमती :

काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मजुरी व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यात झालेली वाढ महागाईसाठी कारणीभूत ठरते.

उदाहरणार्थ- नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या रोगांच्या काळात दळणवळण करणाऱ्या व्यवसायांकडून जास्त किंमत आकारली जाते.

आपत्तीजन्य परिस्थितीत अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचे निर्माते आपल्या उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ करू शकतात.

ii) उत्पादन खर्चातील वाढ :

वस्तू आणि सेवांच्या उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे उत्पादकांकडून आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी वस्तूंच्या किंमतीत वाढ केली जाते.

परंतु उत्पादन खर्चातील वाढीमुळे वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हा खर्चाच्या दबावाला दिला जाणारा वाजवी प्रतिसाद असून या परिस्थितीला कंपनीच्या नफ्यात झालेली वाढ म्हणता येणार नाही.

iii) अतिरिक्त नफा आणि बाजारभाव :

नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपल्या व्यवसायाचा नफा वाढविण्यासाठी उत्पादकांकडून अर्थव्यवस्थेचे शोषण केले जाते.

याप्रसंगी उत्पादन खर्चात झालेल्या वाढीच्या तुलनेत वस्तूंची आकारलेली किंमत अतिरिक्त असल्यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नफा होतो.

बहुतांश वेळा उत्पादन खर्चात घट झाल्या नंतर देखील उत्पादकांकडून वस्तू व सेवांच्या किंमती कमी केल्या जात नाहीत. अशावेळी कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्यात वाढ होऊन चलनवाढीची परिस्थिती उद्भवते.

E – ग्रीडफ्लेशन (Greedflation)

मजुरी किंमत चक्रामुळे महागाई वाढण्याऐवजी कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्यामुळे जेव्हा महागाई वाढते त्या परिस्थितीस ग्रीडफ्लेशन असे म्हणतात.

यामध्ये नफा किंमत चक्राचा (Profit Price Spiral) समावेश असतो. कंपन्या वाढीव खर्चाचे नियोजन करण्याच्या पलीकडे जाऊन नफ्याचे मार्जिन वाढविण्यासाठी किमतीत जास्त वाढ करून महागाईचा फायदा घेतात. कंपन्यांच्या या वर्तनामुळे चलनवाढीत आणखी वाढ होते.

अमेरिका आणि युरोपातील विकसित देशांमध्ये एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून ग्रीडफ्लेशनला मान्यता मिळत आहे.

ग्रीडफ्लेशनचे परिणाम :

ग्रीडफ्लेशनमुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊन त्यांची क्रयशक्ती कमी होते आणि त्यांचे जीवनमान खालावते.

याशिवाय ग्रीडफ्लेशनमुळे उच्च उत्पन्न गटाकडे संपत्तीचे केंद्रीकरण होऊन उत्पन्न असमानतेत वाढ होते.

ग्रीडफ्लेशनमुळे वस्तू आणि सेवांच्या किंमतीत अत्याधिक वाढ होऊन टिकाऊ बाजार परिस्थितीला धोका निर्माण होतो.
परिणामी अधिकाधिक आर्थिक संकटांमुळे एकूण आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकते.

ग्रीडफ्लेशनमुळे होणारा चलनवाढीचा दबाव विविध देशांमधील भिन्न धोरणांना कारणीभूत ठरू शकतो कारण प्रत्येक राष्ट्र चलन वाढीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करत असते.

यातूनच परस्परविरोधी दृष्टिकोन निर्माण होतो.वरील सर्व परिणामांचा विचार करता ग्रीडफ्लेशन जागतिक असमतोल, व्यापार तणाव आणि भू-राजकीय संघर्षाना कारणीभूत ठरू शकते.

भारतातील ग्रीडफ्लेशनची परिस्थिती :

भारतातील सूचीबद्ध कंपन्यांच्या निव्वळ नफ्याने 2022-23 च्या आर्थिक वर्षाअखेर विक्रमी उच्चांक गाठला आहे.

मार्च 2023 अखेर भारतीय सूचीबद्ध कंपन्यांचा निव्वळ नफा 2.9 ट्रिलियन रुपये इतका आहे.

हा आकडा कोरोनापूर्वकाळाच्या (डिसेंबर 2017 ते डिसेंबर •2019) साडेतीन पटींनी अधिक आहे.

भारतीय कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात झालेली लक्षणीय वाढ ही कोरोना महामारीनंतरच्या काळात अपवादात्मक नफा निर्मिती दर्शविते.Greedflation

ग्रीडफ्लेशनचे अस्तित्व :

केवळ नफ्याच्या मार्जीनमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनामुळे भारतीय कंपन्यांमधील निव्वळ नफ्यात अंदाजे 60% वाढ झाली आहे.

वस्तू आणि सेवांच्या विक्रीमुळे नफ्यात झालेल्या वाढीचे प्रमाण 36% इतके आहे.

उर्वरित टक्केवारी (4%) या दोन घटकांच्या संयोगामुळे होणारा अधिलाभांश दर्शविते.

वरील आकडेवारी भारतातील ग्रीडफ्लेशनची परिस्थिती दर्शविते.What is greedflation

National Green Hydrogen Mission : महाराष्ट्र हे भारतातील या प्रकारचा हायड्रोजन मिशन प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ठरले.

MPSC Radio Channel वर आपणास सामान्य ज्ञान ,चालू घडामोडी व नवीन जाहिराती बद्दल माहिती देण्यासाठी आहे.

2 thoughts on “Greedflation: What is greedflation |ग्रीडफ्लेशन म्हणजे काय ?”

Leave a Comment