Rajarshi Shahu Puraskar & Gandhi Peace Prize

Rajarshi Shahu Puraskar & Gandhi Peace Prize : महाराष्ट्रचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग

भारतचा धार्मिक ग्रंथांच्या प्रसारासाठी प्रसिद्ध असलेल्या गोरखपूर येथील प्रतिष्ठित ‘Gita Press ‘ला 2021 च्या Gandhi Peace Prize ने सन्मानित करण्यात आले आहे.

राजर्षी शाहू पुरस्कारrajarshi shahu gandhi peace

राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना जाहीर झाला.

कोणामार्फत :

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टमार्फत देण्यात येतो.

घोषणा :

ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केली.

निमित्त:

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार जयंतीदिनी 26 जून रोजी समारंभपूर्वक दिला जातो.

पुरस्कृत करण्याचे कारण :

या उभयतांनी Women’s Health, Rural Health Child Health अशा विषयामध्ये केलेल्या व्यापक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्काराचे स्वरूप :

एक लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र

डॉ. बंग यांच्याबद्दल :

1) डॉ. अभय बंग यांचे बालपण महात्मा गांधीच्या सेवाग्राम आश्रमात गेले असून

2) महात्मा गांधीचे विचार, वैज्ञानिक संशोधनाची कार्यपद्धती, ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांची वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय ते जागतिक आरोग्य नीतीवर प्रभाव असा त्यांचा प्रवास आहे.

3) डॉ. बंग यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान विद्यापीठात व भारतात प्रथम स्थान, 4 सुवर्णपदके तसेच डी.लिट उपाधीने गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार :

त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कार

दोन राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण

भारतीय आरोग्य विज्ञान संशोधन संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.

गोईण पुस्तकाला साहित्य पुरस्कार

आदिवासींचे सामाजिक आरोग्य या विषयातील संशोधनासाठी ‘आदिवासी सेवक’ व मुक्तीपद व्यसनमुक्त केंद्राला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

समिती वरील अध्यक्ष व सदस्य :

अध्यक्ष भारत सरकार आदिवासींचे आरोग्य यावरील तज्ञ समिती

अध्यक्ष : बालमृत्यू व कुपोषण विषयक समिती

सदस्य: महाराष्ट्र शासन संतुलित विकास समिती

सदस्य : अमेरिकेतील राष्ट्रीय विज्ञान अकादमी- वैद्यकीय समिती

गांधी शांतता पुरस्कारrajarshi shahu gandhi peace

धार्मिक ग्रंथांच्या प्रसारासाठी प्रसिद्ध असलेल्या गोरखपूर येथील प्रतिष्ठित ‘Gita Press ‘ला 2021 च्या Gandhi Peace Prize ने सन्मानित करण्यात आले आहे.

Gita Press ला हा पुरस्कार देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने घेतला आहे.

गांधी शांतता पुरस्काराविषयी :

1995 मध्ये महात्मा गांधीजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठित गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. हा पुरस्कार शांतता आणि अहिंसेच्या गहन वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

व्यक्ती / संघटना / संस्था किंवा समाजाने नामांकन वर्षापूर्वीच्या 10 वर्षात केलेल्या कामाचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो.

1 कोटी रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, रचलेला फलक आणि उत्कृष्ट हस्तकला किंवा हातमाग निर्मितीचा नमुना असणारी वस्तू हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. h

निवड मंडळाने निर्धारित केल्यानुसार एक किंवा अधिक व्यक्ती किंवा संस्था यांच्यामध्ये हा पुरस्कार सामायिकरित्याही दिला जातो.

” पंथ किंवा लिंग,वंश, भाषा, जात, राष्ट्रीयत्व “ यांचा विचार न करता हा पुरस्कार सर्वांसाठी खुला आहे.

पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या निवड मंडळामध्ये भारताच्या पंतप्रधानांसोबत भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता आणि इतर दोन प्रतिष्ठित सदस्य असतात.

” Gandhi Peace Prize 2021 चा “गीता प्रेस गोरखपूर” ला का देण्यात आला? “

भगवद्गीता, रामायण आणि उपनिषद यांसारख्या धार्मिक ग्रंथांच्या सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक असणाऱ्या गोरखपूर येथील Gita Press ला 2021 च्या Gandhi Peace Prize ने सन्मानित करण्यात आले.

Gita Press शांतता आणि सामाजिक सौहार्दाच्या गांधीवादी आदर्शांना चालना देण्यासाठी योगदान देते. तसेच याबरोबरच Gita Press ने समाजसेवेत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी प्रकाशन गृहाच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.rajarshi shahu gandhi peace

“Gita Press , गोरखपूर”

गांधीवादी तत्त्वांना चालना देऊन सामाजिक कार्यातील योगदान तसेच 2023 मध्ये असणाऱ्या गीता प्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्त गांधी शांतता पुरस्कार 2021 ने गीता प्रेसला गौरविण्यात आले आहे.

1923 मध्ये स्थापन झालेली गीता प्रेस ही जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे.

आपल्या शंभर वर्षांच्या इतिहासात गीता प्रेसने 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये 41.7 कोटी इतक्या प्रचंड प्रमाणात पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यात भगवद्गीतेच्या तब्बल 16.21 कोटी प्रतींचा समावेश आहे.

प्रकाशनांमध्ये जाहिरातींवर अवलंबून न राहता कमाईची बांधिलकी हा गीता प्रेसचा एक अनोखा पैलू आहे.

जाहिरातीमधून पैसा मिळविण्याऐवजी गीता प्रेस तिच्या संलग्न संस्थांच्या संयोगाने जीवनाची गुणवत्ता आणि व्यक्तींचे कल्याण सुधारण्याच्या उद्देशाने प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करते.

हिंदू धर्मातील सनातन धर्माच्या तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार करणे हे गीता प्रेसचे मुख्य उद्दिष्ट आहे.

भगवद्गीता, रामायण, उपनिषद, पुराण, प्रख्यात संतांची प्रवचने आणि इतर चारित्र्य घडवणारी पुस्तके आणि मासिके यांसारख्या महत्त्वाच्या हिंदू ग्रंथांच्या प्रकाशनाद्वारे आणि अत्यंत सवलतीच्या दरात त्यांचे विपणन करून हा उद्देश साध्य केला जातो.

गांधी शांतता पुरस्काराचे मागील विजेते”

भूतकाळातील गांधी शांतता पुरस्कार विजेत्यांमध्ये इस्रो, रामकृष्ण मिशन, ग्रामीण बैंक ऑफ बांगलादेश, कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र, अक्षय पत्र आणि सुलभ इंटरनॅशनल या संस्थांचा समावेश आहे.

वरील संस्थांव्यतिरिक्त पुढील काही व्यक्तींनादेखील वैयक्तिकरित्या गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे –

1.नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष.

2.ज्युलियस न्येरेरे, तानझाण्याची माजी राष्ट्राध्यक्ष.

3.बाबा आमटे.

4.डेस्मंड टूटू, दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप.

5.काबूस बिन सैद अल सैद, ओमानचे सुलतान. rajarshi shahu gandhi peace

“गांधी शांतता पुरस्काराचे निवड मंडळ”

पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या गांधी शांतता पुरस्कार निवड मंडळामध्ये भारताचे पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि इतर दोन प्रतिष्ठित सदस्य असतात.

या सदस्यांचा कालावधी तीन वर्षे इतका आहे.

यापैकी पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे पदसिद्ध सदस्य असून इतर दोन प्रतिष्ठित सदस्य 3 वर्षांनी निवृत्त होतात, तसेच ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात.

पंतप्रधान हे या निवड मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या अनुपस्थितीत निवड मंडळाचे इतर सदस्य पिठासीन अधिकाऱ्याची निवड करतात.

पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी या निवड मंडळातील सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे.

निवड मंडळाने घेतलेल्या निर्णयाला कोणत्याही प्रकारे आव्हान दिले जाऊ शकत नाही.

National Human Rights Commission

MPSC Radio Channel 

Leave a Comment